जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन जणांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फरारपैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी सहा जणांना न्यायमुर्ती श्रीमती एम.एम.बढे यांनी सोमवार १२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.