---Advertisement---

नीट’ परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थीनीवर टिफिन बॉयने केला अत्याचार

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नीट’ परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थीनीवर टिफिन बॉयने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आरोपी तरूणाला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तरूणीच्या वसतिगृहात जेवण देण्यासाठी यायचा. याच काळात आरोपी तरूण आणि पीडितेची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीनं तरूणीला दारू पाजली. तिच्यावर बलात्कार केला. या लज्जास्पद कृत्याचा त्याने व्हिडिओही काढला. आरोपी तरूण तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता.

पीडित अल्पवयीन मुलगी बिहारची रहिवासी आहे. ती नीटची तयारी करण्यासाठी तिच्या बहिणीसोबत कोटा येथे वसतिगृहात राहते. संशयित आरोपी हा टिफिन देण्याचे काम करतो. तो मूळचा पिपळदा परिसरातील रहिवासी आहे. तो सध्या कोटा येथील बालाजी नगर भागात राहतो. वसतिगृह मालक मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---