जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर तुम्ही PNB मध्ये या पदांसाठी अर्ज करू शकता. पंजाब नॅशनल बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज प्रक्रिया 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2024 असेल.
रिक्त जागा तपशील
ऑफिसर क्रेडिट – 1000 पदे
व्यवस्थापक – फॉरेक्स – 15 पदे
व्यवस्थापक – सायबर सुरक्षा – 5 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक – सायबर सुरक्षा – 5 पदे
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.
पद क्र.2: (i) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव
निवड कशी होईल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. मार्च/एप्रिल महिन्यात परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. अपडेट्स जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या – pnbindia.in वेळोवेळी. येथूनही अर्ज करता येतील.
परीक्षा शुल्क :
अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1180 रुपये आणि जीएसटी शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWBD उमेदवारांना 59 रुपये अधिक GST भरावा लागेल.
पगार : दरमहा 36 हजार ते 78 हजार रुपयांपर्यंत आहे.