IDBI बँक म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) या पदासाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर केली. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आयडीबीआय बँकेच्या https://www.idbibank.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा : 500
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्यांचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांचा जन्म 31 जानेवारी 1999 पूर्वी आणि 31 जानेवारी 2004 नंतर झालेला नसावा. एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसींना तीन वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षांची सूट मिळेल. 1984 च्या दंगलीत बाधित झालेल्यांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल.
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. जे फक्त डिप्लोमा कोर्स करत आहेत ते अर्ज करण्यास पात्र नाहीत. उमेदवारांना संगणकाचे चांगले मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे.
अर्ज फी
– अनुसूचित जाती/जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये आहे.
-अन्य उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 1000 आहे.