नोकरीची सुवर्णसंधी! एसटी महामंडळाकडून मोठी भरती

महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाकडून मेगा भरती प्रक्रिया राबविली जात आहे. अनेक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असून अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जातेय. केवळ दहावी पासच नाही तर आयटीआयमधील तरुणांनाही नोकरीची संधी आहे. याबाबत महामंडळाकडून नुकतेच एक अधिसूचना काढण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण हे सातारा असणार आहे. त्यामुळे याबाबत इच्छुकांनी त्वरीत निर्णय घेण्याची गरज आहे. ही भरती प्रक्रिया 145 पदांसाठी आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया होत आहे. 13 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वीच अर्ज करावेत. भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर विभाग नियंत्रक कार्यालय, एस. टी. स्टॅण्ड जवळ , सातारा येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.

या पदांसाठी आहेत जागा
मोटार मेकॅनिक वाहन एकून जागा 40, मेकॅनिक डिझेल एकून जागा 34, ऑटो इलेक्ट्रिशियन एकूण जागा 30, प्रशितन व वातानुकुलिकरण एकूण जागा 6, मोटार वाहन शीट मेटल वर्कर एकूण जागा 30, टर्नर एकूण जागा 3, वेल्डर एकूण जागा 2 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

वेतन – (मासिक)
मोटार मेकॅनिक वाहन – ८ हजार ५० रुपये
मेकॅनिक डिझेल – ७ हजार ७०० रुपये
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ७ हजार ७०० रुपये
ऑटो इलेक्ट्रिशियन – ८ हजार ५० रुपये
वेल्डर – ७ हजार ७०० रुपये
टर्नर – ८ हजार ५० रुपये
प्रशितन व वातानुकुलिकरण – ७ हजार ७०० रुपये

या भरती प्रक्रियेबद्दलचे अधिक अपडेट वेबसाईटवर बघायला मिळतील.

अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यासाठी पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ, सातारा – ४१५००१

जाहिरात पहा : PDF