Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे देशसेवेचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. सशस्त्र सीमा बल अर्थात एसएसबीने कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदाच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एसएसबीची अधिकृत वेबसाईट ssbrectt.gov.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा बल यांनी विविध ट्रेडमध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या 543 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सुतार, लोहार, ड्रायव्हर, शिंपी, माळी, मोची, पशुवैद्यकीय, पेंटर, वॉशरमन, न्हावी, सफाईवाला, स्वयंपाकी आणि जलवाहकांच्या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठीची भरती तात्पुरती असेल परंतु ती पुढे वाढवता येईल.
या भरती प्रक्रियेसाठी करणारे उमेदवार ssbrectt.gov.in या अधिकृत भरती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. एसएसबीने या भरती जाहिरातीमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होण्याच्या तारखेब द्दल माहिती दिलेली नाही. 13 मे 2023 रोजी प्रकाशित झालेल्या ताज्या एम्पलॉयमेंट बातम्यांमध्ये जाहिरात प्रकाशित होताच अधिकृत भरती पोर्टलवर देखील अर्ज प्रक्रिया सुरू झाली.
उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि रिक्त पदांशी संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्रे मिळविली आहेत. तसंच किमान दोन वर्षे संबंधित कामाचा अनुभव आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर अनेक पदांसाठी कमाल वयोमर्यादा 23 आणि 25 वर्षे देण्यात आली आहे.