तरुण भारत लाईव्ह । १० ऑक्टोबर २०२३। नोकिया कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 8GB RAM व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वीच स्मार्टफोनचा एकमेव ६जीबी रॅम व्हेरिएंट हा बाजारात आणला होता. ८ GB RAM असलेला हा स्मार्टफोनचे वैशिट्य काय आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत काय आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
नोकिया जी४२ ५जी फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह येणार हा एलसीडी पॅनल ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या स्मार्टफोन मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी Nokia G42 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ह्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंट पॅनलवर ८ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
नोकिया जी४२ ५जी पर्पल आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध आहे. ह्या मॉडेल सोबत ब्लूटूथ हेडफोन मोफत मिळतात. तर ६जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,५९९ रुपये होती जो अॅमेझॉन सेलमध्ये ११,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे.