एकीकडे सोन्याच्या किमतीने आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमधील सर्व विक्रम मोडीत काढले. दुसरीकडे, नवी दिल्लीच्या सराफा बाजारातही सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात 1000 रुपयांहून अधिक वाढ झाली आणि किंमत 68,400 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे गेली आहे .