---Advertisement---

पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा; घेणार राजकारणातून ‘ब्रेक’

---Advertisement---

मुंबई : मी २० वर्षात कधीही सुट्टी घेतली नाही. मला आता त्याची गरज आहे. मला अंर्तमुख होण्याची गरज आहे. मी आमदार झाल्यावर माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की, राजकारणात ज्या विचारधारेला डोळ्यासमोर मी पुढे आली. त्या विचारधारेशी मला कधी प्रतारणा करावी लागेल किंवा चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातून एक्झिट घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची आवश्यकता आहे. तो मी घेणार आहे. मी राजकारणापासून २ महिने सुट्टी घेऊन अंर्तमुख होऊन सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहे अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. यासंदर्भात अनेक तर्क-वितर्कही लावले जात होते. पंकजा मुंडेंनी राहुल गांधींची भेट घेतल्याचेही दावे केले जात होते. मात्र, आज पंकजा मुंडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते सर्व दावे खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. आपण पक्ष सोडत नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चा तूर्तास थांबल्या असल्या, तरी या स्पष्टीकरणासोबतच पंकजा मुंडेंनी आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली.

मी रोज बातम्या बघते की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही. मला वाटतं की उद्या लोकानी पंडित दीनदयाल उपाध्याय व अटलजींची भाजपा राहिली नाही असा विचार करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचं आपलं काम आहे. मात्र या सगळ्या भूमिकांशी प्रतारणा करणार्‍या भूमिका माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी प्रचंड संभ्रमात आहे. मी गेल्या २० वर्षांत सुट्टी घेतलेली नाही. मला एक-दोन महिने सुट्टीची गरज आहे. जनतेच्या बाबतीत काय घडतंय, यावर विचार करण्याचीही गरज आहे. अंतर्मुख होऊन मी जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे. त्याच वाटेवर मी आहे का, हे तपासून बघण्याची मला गरज आहे, असं त्या म्हणाल्या.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---