पंतप्रधानांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार; मात्र केजरीवालांना झटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये  १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आयोजक रोहित टिळक यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. मात्र, शरद पवार या दिवशी पुण्यातच थांबल्यास राज्यसभेत हा केजरीवालांना धक्का मानला जात आहे.

१ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकाकरसंबंधी एक विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहावं यासाठी आपचे नेते अरविंद केजरिवाल प्रयत्न करणार होते. मात्र शरद पवार या दिवशी पुण्यातच थांबल्यास राज्यसभेत हा केजरीवालांना धक्का मानला जात आहे.

मागील काही दिवसांपासून शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहणार की पुण्यातील टिळक पुरस्कार कार्यक्रमाला हजेरी लावणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना दिला जाण्यावर आक्षेप देखील घेतला. या चर्चेदरम्यान शरद पवार १ ऑगस्टला पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असल्याचा दावा टिळक पुरस्कार समितीचे रोहित टिळक यांनी केला आहे. तसेच हा कार्यक्रम जसा ठरला आहे, तसाच होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.