पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांनी पहिल्यांदा नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी झाली होती. मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही रोड शोमध्ये दिसले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वात लांब पुल अटल सेतूचे उद्घाटन करणार आहेत.
नाशिकमध्ये रोड शो केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली. यासोबतच पंतप्रधान मोदींमोदींनी श्री काळाराम मंदिरात पोहोचून पूजा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे वाद्येही वाजवली.
https://fb.watch/pwQbZBPmO4/?mibextid=RtaFA8
यानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मंत्री दादा भूसे देखील हजर होते. दादा भूसे यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी तीन पावली नृत्य केले. त्यांचा नृत्याचा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. डफड्याच्या तालावर दादाभुसेंनी चांगलाच ठेका धरला.
https://fb.watch/pwQbZBPmO4/?mibextid=RtaFA8