धुळे : महानगराजवळील बाळापूर गावात गाव दरवाज्यानजीक भाजपा-महायुतीच्या वतीने जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे म.न.पा. चे माजी महापौर जयश्री अहिरराव या बोलत होत्या.
महिलांना सर्व क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण, उज्वला गॅस योजना, जन धन योजना, बचत गटांना कमी व्याज दरात कर्ज प्राधान्याने उद्योग धंद्यास प्रेरीत करून सक्षम व स्वावलांबी बनविण्याची अभूतपुर्व कामगीरी भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केली.
या प्रसंगी महिला मोर्चा नेत्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या मा. डॉ. माधुरी बोरसे यांनी हि मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपिठावर महापौर प्रदीप नाना कर्पे मंडल अध्यक्ष बबनराव चौधरी, दिनेश पाटील, नगरसेवक संजय पाटील, भटूआबा पाटील, भिकन खाटीक, राहुल पाटील, विनोद पाटील, फकिरा आप्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.