पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या ५ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी पुण्याात दाखल होणार आहेत. पुण्यातील लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यासाठी ते पुण्यात येत आहेत. याआधी १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पुण्यात आले होते.
यावेळी त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर आता जवळपास दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा ते पुण्यात दाखल होणार आहेत. येत्या ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येतील. पुण्यातील लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचे उद्धाटन पार पडणार आहे. या उद्धाटनासाठीच ते पुण्यात येत आहेत.