पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार ‘या’ योजनेचा प्रारंभ, वाचा काय आहे उद्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्ते आज (17 सप्टेंबर 2023) नवी दिल्लीत ‘पीएम-विश्वकर्मा’ या केंद्रीय क्षेत्र योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील निपुण कारागिरांना ओळख आणि सर्वांगीण मदत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, निर्मिती आणि व्याप्ती वाढवणं, त्यांना एमएसएमई मूल्य साखळींमध्ये सामावून घेणं हा या योजनेचा उद्देश आहे.

संपूर्ण सरकार या दृष्टिकोनांतर्गत, लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी आज देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे 70 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

केंद्रीय मत्स्यउद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परुषोत्तम रुपाला हे आज कर्नाटकमधील मंगळूर येथे मत्स्यउद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.