---Advertisement---

पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना दिला धीर, म्हणाले…

---Advertisement---
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने हल्ला केल्यानंतर आता इस्त्रायलनेही हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टी पूर्णपणे सील केली आहे. यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन त्यांच्याशी इस्त्रायलमधील परिस्थितीबद्दल संवाद साधला आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. “मी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फोन केल्याबद्दल आणि चालू परिस्थितीबद्दल अपडेट्स दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे.
इस्त्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या भागात केलेल्या कारवाईनंतर त्यांना हमासच्या १५०० दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच ज्या भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती त्या सर्व भागांवर आता इस्रायली लष्कराचे नियंत्रण आहे. दरम्यान, हमासने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास ९०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असून ३००० लोक जखमी झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment