मुंबईः अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी काही वेळापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या तरी सगळ्यांच्याच डोक्यात गोंधळ सुरु आहे. अजित पवारांनी बंड केलं की राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारने पाठिंबा दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सूत्रांनुसार, ‘हे पक्षांतर नसून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत’ अशी भूमिका अजित पवारांचा गट घेऊ शकतो. अजित पवारांसोबत २५ ते ४० आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. थोड्याच वेळात अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. शरद पवार हेदेखील पत्रकार परिषद घेणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, आमचीच खरी शिवसेना, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तशीच भूमिका अजित पवार घेऊन शकतात असं राजकीय जाणकार सांगत आहे.