---Advertisement---

पक्ष गेलं, चिन्ह गेलं आता दोस्त-दोस्त ना रहा… आदित्य ठाकरेंच्या सर्वात जवळच्या नेत्याचा उद्या शिंदे गटात प्रवेश

---Advertisement---

मुंबई : आमदार मनिषा कायंदे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. ते उद्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राहुल कनल हे येत्या एक जुलै रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. गेल्या वर्षी राहुल कनल यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडला होता. तेव्हापासून राहुल कनाल हे शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते.

यामुळे ठाकरे गटाने सावध पाऊल उचलले आहे. राहुल कनाल यांच्या विभागातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधील युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून हे आदेश काढण्यात आले. राहुल कनाल हे उद्याच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---