पक्ष सोडून जायचे असेल…, असं का म्हणाले शरद पवार?

मुंबई : पक्ष सोडून कोणाला जायचे असेल तर थांबवू शकत नाही. असं राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीवर पक्षाच्या घडामोडींचा परिणाम नाही. आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणार. अजित पवार यांना सर्वात अगोदर असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. अशी माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अजित पवार नव्हते. पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी अजित पवार यांचे नाव न घेता शरद पवार म्हणाले की, या ठिकाणी कोणी उपस्थित आहे की नाही? याची चर्चा करु नये, याचा वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले. आपल्या राजीनाम्याची कल्पना अजित पवार यांना दिली होती, असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची व पुनश्च अध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

यावेळी पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “२ मे २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या विमोचन समारंभाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.