पतीचा मृतदेह घरी पोहोचला… पत्नीने पाहताच सातव्या मजल्यावरून मारली उडी

देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या कौशांबीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील अल्काईन सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. मृतदेह घरी पोहोचल्यावर पत्नीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या जोडप्याचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. याआधी दोघेही बरेच दिवस प्रेमसंबंधात होते. सध्या गाझियाबादचे कौशांबी पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.