पती बाहेर, पत्नी आमसुल… घराला लागली अचानक आग; पशुधनासह साहित्याचे नुकसान

नंदुरबार : उमटी ता. अक्कलकुवा येथे २३ रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागली. या आगीत घरासह संसारोपयोगी वस्तू, एकवीस हजार रुपये रोख जळून राख झाले. शिवाय घरातील मुके जनावरे गाय, वासरू, शेळ्या, कोंबळ्या भाजल्या गेल्या. यात शेळी व वसरू मृत लावले तर गाय ८० भाजली आहेत. परिणामी आगग्रस्त कुटुंब उघड्यावर आलं असून, शासने तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.

अककलकुवा तालुक्यातील उमटीच्या पाटीलपाडा येथे मिलींद गिंबा वळवी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. २३ रोजी दुपारी ३.१५ सुमारास मिलींद वळवी हे बाहेरगावी तर त्यांच्या पत्नी सुनीता या कैरीचे आमसुल तयार करण्यासाठी बाहेर गेलेल्या होत्या. दरम्यान, तीघे मुले बाहेर खेळत असताना, त्यांच्या घराला अचानक आग लागली.

या आगीत घरासह संसारोपयोगी वस्तू, एकवीस हजार रुपये रोख जळून राख झाले. शिवाय घरातील मुके जनावरे गाय, वासरू, शेळ्या, कोंबळ्या भाजल्या गेल्या. यात शेळी व वसरू मृत लावले तर गाय ८० भाजली आहेत. त्यामुळे आगग्रस्त कुटुंब उघड्यावर आलं असून, शासने तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.