छत्तीसगडच्या राजधानीत पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करून पोलिसांपासून पळ काढण्यासाठी मृतदेह बिहारमध्ये नेऊन टाकण्याची योजना आखली. प्लॅननुसार आरोपींनी मृतदेह गाडीत टाकला आणि बिहारला जाण्यासाठी निघाले, मात्र सोबत ठेवलेले पैसे आणि डिझेल संपल्याने आरोपींनी मृतदेह कोरबा येथील निर्जनस्थळी नेऊन पेटवून दिला. नंतर रायपूर येथील आपल्या घरी आले. खुनाच्या अवघ्या 24 तासांनंतर रायपूर पोलिसांनी या खळबळजनक घटनेत सहभागी असलेल्या मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे.