उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात पती-पत्नीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पत्नीला शमशाबाद पोलीस स्टेशन परिसरात सरकारी नोकरी लागली. ती सरकारी लेखापाल झाली आणि तिच्या सरकारी नोकरीत इतकी व्यस्त झाली की तिला पूर्वीसारखं घरच्या कामात पूर्ण लक्ष देता आलं नाही. यामुळे पती नाराज झाला आणि दोघांमध्ये खडाजंगी सुरू झाली. पत्नीच्या सरकारी कामामुळे पतीला अडचणी येत असताना त्याने नोकरी सोडण्यासाठी तिच्यावर दबाव आणला, मात्र महिला नोकरी सोडण्यास तयार नव्हती. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. हे प्रकरण कुटुंबाच्या तोडफोडीपर्यंत पोहोचले. याप्रकरणी पती-पत्नी कुटुंब समुपदेशन केंद्रात पोहोचले.
पत्नी अकाऊंटंट झालेली पतीला आवडली नाही, म्हणाला ‘नोकरी सोड अथवा घर’
Updated On: एप्रिल 29, 2024 10:56 am

---Advertisement---