पत्नी प्रियकरासह पळाली, खचलेल्या पतीने उचललं भीषण पाऊल, मुलांचीही प्रकृती चिंताजनक

पत्नी प्रियकरासह पळून गेल्याने चिंतेत असलेल्या पतीने आपल्या तीन मुलांना विष पाजले. तसेच स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरलं. विष प्राशन केल्यांनतर तात्काळ गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर तीन निष्पाप मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालय गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचलेले पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, चार जणांनी विष प्राशन केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यातील वडिलांचा मृत्यू झाला आहे. 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

विष प्राशन करण्यामागच्या कारणाबाबत बोलताना ते म्हणाले की, बहरामपूर गावातील धरमचंद हे कौटुंबिक वादामुळे अत्यंत अस्वस्थ आणि शॉकमध्ये होते. याच कारणावरून सोमवारी आपल्या तीन निष्पाप मुलांना विष पाजल्यानंतर त्याने स्वतःही विष प्राशन केले. तसेच मृताची पत्नी प्रियकरासह पळून गेल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे तो चिंतेत होता. त्याने भीषण पाऊल उचलत मुलांसह स्वत: विष प्राशन केले आणि त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरा ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथेही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पत्नीचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे.