पत्नी मुलांसोबत माहेरी, घरी पतीने उचललं टोकाचं पाऊल; बांभोरीमधील घटना

धरणगाव : बांभोरी येथे जयेश सुभाष तायडे (३५) याने राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, ६ जून रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात जयेश तायडे हा आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. खाजगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दोन दिवसांपासून त्याची पत्नी सोनीबाई या दोन्ही मुलांसोबत माहेरी आमोदा येथे गेलेल्या होत्या. जयेश हे एकटेच घरी होते. बुधवार, ५ जून रोजीच्या मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी सोनी यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांनी नातेवाईक अशोक नन्नवरे यांना फोन करून घरी जाण्याचे सांगितले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

तातडीने दरवाजा तोडून आत प्रवेश करत खाली उतरवत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंतिम मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ विशाल, पत्नी सोनीबाई, मुलगा देवेश आणि मुलगी गुंजन असा परिवार आहे.