पत्रकारितेची पदवी आहे का? MahaGenco अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी ! पगार 115905 पर्यंत

पत्रकारितेची पदवी असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ‘सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी’ या पदासाठी ही भरती होणार आहे.

त्यानुसार पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

एकूण रिक्त जागा : 01
पदाचे नाव : ‘सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी’
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पत्रकारितेत किंवा मास कम्युनिकेशन मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधुन पत्रकारिता किंवा जनसंवादात प्रथम श्रेणीसह बॅचलर पदवी 02) इंग्रजी, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे 03) 03 वर्षे अनुभव.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : 944/- रुपये (फी चे पैसे डिमांड ड्रफ्ट ने पाठवायचे आहेत त्यासाठी बँकेतून “MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LIMITED” या नावाने payable at “Mumbai” असा डिमांड ड्रफ्ट करायचा आहे.)

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 45,800/- रुपये ते 1,15,905/- रुपये पगार मिळेल

वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक (एचआर – आरसी ), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. एस्त्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड , तळमजला , लेबर कॅम्प , धारावी रोड , माटुंगा – 400 019

नोकरीचे ठिकाण : मुंबई ( महाराष्ट्र )
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा