पदवीधरांना राज्य शासनाच्या नोकरीची मोठी संधी; ‘या’ विभागात नवीन मेगाभरती जाहीर

पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. नुकतीच या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे.

पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक या पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 345 जागा भरल्या जातील. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. त्यामुळे लक्ष्यात ठेवा ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीय.  अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.

आवश्यक पात्रता 

पुरवठा निरीक्षक -पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
उच्चस्तर लिपिक – पदवीधर

वयाची अट :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट राहील

परीक्षा शुल्क । अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 92,300/- रुपये. (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 डिसेंबर 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 13 डिसेंबर 2023]