केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2024 आहे. CBSE भर्ती 2024 साठी निवडलेल्या उमेदवारांना बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयात नियुक्त केले जाईल.
पदाचे नाव :
1) असिस्टंट सेक्रेटरी (Administration) 18
2) असिस्टंट सेक्रेटरी (Academics) 16
3) असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) 08
4) असिस्टंट सेक्रेटरी (Training) 22
5) अकाउंट्स ऑफिसर 03
6) ज्युनियर इंजिनिअर 17
7) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर 07
8) अकाउंटेंट 07
9) ज्युनियर अकाउंटेंट 20
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.4: संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
पद क्र.5: पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
पद क्र.6: B.E./B.Tech. (Civil)
पद क्र.7: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
पद क्र.8: (i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा : प्रत्येक पदासाठी कमाल वयोमर्यादा स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराचे वय 27 ते 35 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल.
अर्ज फी
CBSE भर्ती 2024 च्या गट A पदांसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 1500 रुपये आणि गट B, C साठी, 800 रुपये द्यावे लागतील. प्रत्येक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD, माजी सैनिक, महिला आणि नियमित CBSE कर्मचाऱ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.