पदवी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. तेही सरकारी बँकांमध्ये. विशेष म्हणजे या भारतीमार्फत तब्बल 4455 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी आजिबात वेळ वाया न घालवता लगेचच अर्ज करावा.
ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत राबविली जात असून या भरतीद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहे . या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट पर्यंतच होती. मात्र या भरतीला 28 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय .
या बँकांमध्ये होणार भरती?
ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरली जातील.
आवश्यक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा काय? :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी. याचा अर्थ उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1994 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2004 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखांसह). राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
इतके भरावे लागेल अर्ज फी?
SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹175 (GST सह) आहे तर इतर सर्वांसाठी अर्ज शुल्क ₹850 (GST सह) आहे.
निवड कशी होईल?
पीओ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा इत्यादी प्रक्रियेद्वारे केली जाईल. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी प्राथमिक परीक्षा होणार आहे. यामध्ये यशस्वी झालेले उमेदवार 1 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसतील.
अर्ज कसा करावा?
ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवर दिलेल्या PO Apply च्या लिंकवर क्लिक करा.
आता नोंदणी करा आणि अर्ज करा.
तपशील प्रविष्ट करा आणि दस्तऐवज अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा.
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा