पदवीधरांसाठी खुशखबर! तब्बल 300 जागांवर बंपर भरती

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIICL) ने 300 सहाय्यक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पदवीधरांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी ठरू शकते. इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी 16 डिसेंबर 2023 म्हणजे उद्यापासून अर्ज करू शकतात. uiic.co.in साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव : सहाय्यक
पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. तसेच त्याला लेखन, वाचन आणि उत्तम संवाद कौशल्याची जाण असावी.
वयोमर्यादा – 21 वर्षे ते 30 वर्षे. एससी एसटी उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट दिली जाईल. 30.09.2023 पासून वयाची गणना केली जाईल. म्हणजे उमेदवाराचा जन्म 01.10.1993 पूर्वी आणि 30.09.2002 नंतर झालेला नसावा.

अर्ज फी – रु 1000 (जीएसटी अतिरिक्त)
SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी – 250 रु
निवड – ऑनलाइन लेखी परीक्षा आणि प्रादेशिक भाषा परीक्षा. 2 तासांच्या परीक्षेत 120 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. 250 गुणांचे 200 प्रश्न असतील. रिझनिंगमधून 40, इंग्रजीतून 40, संख्यात्मक 40, सामान्य ज्ञान/सामान्य जागरूकता 40 आणि संगणक ज्ञानातून 40 प्रश्न असतील.

पगार – 22405-1305(1)-23710-1425(2)-26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)-49765-2500(5) -62265
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 16 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जानेवारी 2024