सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी एक खुशखबर आहे, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने भरती जाहीर केली असून यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.newindia.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. १० सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर २०२४ आहे.
या पदांसाठी होणार भरती
1) प्रशासकीय अधिकारी (Accounts) 50
2) प्रशासकीय अधिकारी (Generalists) 120
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण]
कसं आहे स्वरूप?
या पदासांठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे (Latest Job News) असावे. राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आलीय. निवड झाल्यास ८८ हजार पगार देण्यात येणार आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
निवड प्रक्रिया पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशी तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पुर्व परीक्षा १३ ऑक्टोबर २०२४ रोजी होईल आणि मुख्य १७ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षेत १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले (Job News) जातील. यामध्ये इंग्रजी, रिझनिंग, क्वालिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस या विषयांवर प्रश्न असतील. तर पेपर II वर्णनात्मक स्वरूपाचा असेल.