पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मेगाभरती जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली असून पदवीधर उमेदवारांना ही सरकारी नोकरीची उत्तम संधी ठरू शकते. या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे.

ही पदे भरली जाणार :
या भरतीद्वारे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदाचे 06 जागा रिक्त आहे. तांत्रिक सहाय्यक – 01 पद, कर सहाय्यक- 468 पदे, लिपिक-टंकलेखक- पदाच्या 7035 जागा रिक्त आहे.

वेतनश्रेणी :
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क -32000/- ते 101600/-
तांत्रिक सहाय्यक – 29,200/- ते 92300/-
कर सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
लिपिक-टंकलेखक – 19200/- ते 63200/-
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

भरतीसाठी पात्रता
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- पदवीधर.
तांत्रिक सहाय्यक – पदवीधर.
कर सहाय्यक- (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक-: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे
शुल्क : अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹544/- शुल्क भरावे लागेल. [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: 17 डिसेंबर 2023
परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे