इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने भरती अधिसूचना जारी केली असून पदवीधर उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे. या भरती मोहिमेद्वारे कार्यकारी पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 एप्रिल 2024 निश्चित करण्यात आली आहे.
रिक्त जागा तपशील
या भरती मोहिमेद्वारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 47 कार्यकारी पदांची भरती केली जाईल. या मोहिमेअंतर्गत 21 पदे अनारक्षित प्रवर्गासाठी, 4 पदे EWS प्रवर्गासाठी, 12 पदे OBC प्रवर्गासाठी, 7 पदे एससी प्रवर्गासाठी आणि तीन पदे एसटी प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आली आहेत.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक. तथापि, विक्री/मार्केटिंगमध्ये एमबीए पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात सवलत दिली जाईल.
एवढी अर्ज फी भरावी लागेल
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 700 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क 150 रुपये भरावे लागतील.
निवड अशा प्रकारे केली जाईल
पदवी/गटचर्चा/वैयक्तिक मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा