सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने लिपिक संवर्गातील पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार या भरतीद्वारे एकूण 8238 जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्याचा कालावधी आज म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, तर अर्ज करण्याची संधी 7 डिसेंबर 2023 पर्यंत राहील.
पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
कोण अर्ज करू शकतो या भरतीसाठी घेतलेल्या लिपिक परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराचे किमान शिक्षण (Education) कोणत्याही शाखेतून पदवीधर असायला हवे.
वयाची अट : उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
SBI लिपिक भरती अंतर्गत, उमेदवारांना प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करावी लागतात. पूर्वपरीक्षा १०० गुणांची असेल. तर मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 190 प्रश्न असतील. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी ऑनलाइन घेतली जाईल. ही चाचणी 1 तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील – इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता. प्रिलिम उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मेन्समध्ये यशस्वी झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.
अर्ज फी
अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 750 रुपये शुल्क जमा करावे लागेल. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे. उमेदवार ऑनलाइन फी जमा करू शकतील.
वेतनमान: – रु.17900/- ते 47920/- पर्यंत
अर्ज कसा करायचा? 1.सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. 2.मुख्यपृष्ठावर जा आणि SBI Clerk Recruitment 2023 Apply Online link वर क्लिक करा. 3. येथे नोंदणी करा, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे येईल. 4. अर्ज पूर्णपणे भरा. 5. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा. 6. अर्ज फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा. 7. अर्ज स्वीकारला जाईल. 8. अर्जाची एक प्रत जतन करा.