पदवी पास तरुणांसाठी खुशखबर! तब्बल 4455 जागांसाठी निघाली भरती

सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन म्हणजेच IBPS ने प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO)/मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच जाहीर केली आहे.

या भरतीद्वारे तब्बल 4455 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष पदवी पास असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी लगेचच अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 1 ऑगस्ट पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

या बँकांमध्ये होणार भरती?
ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरली जातील.

आवश्यक वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी. याचा अर्थ उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1994 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2004 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखांसह). राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची पात्रता:
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.

इतके भरावे लागेल अर्ज फी?
SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹175 (GST सह) आहे तर इतर सर्वांसाठी अर्ज शुल्क ₹850 (GST सह) आहे.

निवड कशी होईल?
पीओ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा इत्यादी प्रक्रियेद्वारे केली जाईल. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी प्राथमिक परीक्षा होणार आहे. यामध्ये यशस्वी झालेले उमेदवार 1 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसतील.

अर्ज कसा करावा?
ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवर दिलेल्या PO Apply च्या लिंकवर क्लिक करा.
आता नोंदणी करा आणि अर्ज करा.
तपशील प्रविष्ट करा आणि दस्तऐवज अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा.

जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा