भारतीय रत्ने आणि दागिन्यांना परदेशी बाजारपेठेत विशेषत: अमेरिका आणि युरोपमध्ये मोठी मागणी आहे. भारतातूनही अशा अनेक वस्तूंची निर्यात केली जाते. पण गेल्या आर्थिक वर्षात जी आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार भारतीय उद्योगपतींचे सुमारे 37 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीत लक्षणीय घट झाली असल्यामुळे हे नुकसान समोर आले आहे.