नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला परदेशातून देणग्या घेण्यासाठी एफसीआरए अंतर्गत परवानगी दिली आहे. त्यामुळे आता परदेशस्थ रामभक्तांनाही मंदिरासाठी देणगी देता येणार आहे.
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी भव्य मंदिराची उभारणी वेगात सुरू असून गर्भगृहासह पहिल्या मजल्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर आता परदेशा रामभक्तांनाही श्रीराम मंदिरासाठी देणग्या देता येणार आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, सरकारच्या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर राम मंदिर ट्रस्टच्या अर्जावर केंद्र सरकारकडून ट्रस्टसाठी विदेशी देणग्या घेण्यास मान्यता मिळाली आहे. यासाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने नवी दिल्लीतील ११, संसद मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेर खाते उघडले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
येथे देता येईल देणगी
बँक व शाखेचे नाव – भारतीय स्टेट बँक, शाखा – 11 संसद मार्ग, नवी दिल्ली
खाते क्रमांक – 42162875158
आयएफएससी कोड – SBIN0000691
खातेधारकाचे नाव – श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र
स्विफ्ट कोड – SBININBB104