---Advertisement---

परिक्षेच्या ओळखपत्रावर चक्क सनी लिओनीचा फोटो ; चौकशीसाठी पोलीस उमेदवाराच्या घरी

---Advertisement---

महोबा : उत्तर प्रदेश पोलीस विभागामार्फत कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2024 घेतली गेली असून मात्र या भर्तीमध्ये एका व्यक्तीच्या परिक्षेच्या ओळखपत्रावर चक्क सनी लिओनीचा फोटो छापण्यात आला. काल हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस चौकशीसाठी उमेदवाराच्या घरी पोहोचले.

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील रगौलिया बुजुर्ग येथील रहिवाशी असलेला धर्मेंद्र कुमार याने महोबा येथील कॉम्प्युटर कॅफेमधून पोलिस भरतीसाठी अर्ज केला होता. ज्यामध्ये परीक्षा केंद्र कन्नौजमध्ये आले.

मात्र त्याच्याकडे असलेल्या प्रवेशपत्रावर धर्मेंद्रच्या ऐवजी सनी लिओनीचा फोटो होता. त्यामुळे धर्मेंद्र यांना परीक्षेला बसू दिले नाही. तसेच धर्मेंद्र यांच्या प्रवेशपत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान,  सनी लिओनीच्या फोटोबाबत त्याने सांगितले की, हे कसे घडले हे मला माहीत नाही. तो म्हणतो की, जेव्हा त्याला प्रवेशपत्र मिळाले तेव्हा त्यावर त्याचा फोटो छापण्यात आला होता. पण नंतर हा फोटो कसा बदलला हे कळले नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी यामागे सोल्व्हर टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपासानंतर काय घडले हे स्पष्ट होईल.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment