पवन खेडा यांना SC कडून झटका, काय आहे प्रकरण ?

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पीएम मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पवन खेडा यांच्या विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस प्रवक्त्यांना या प्रकरणी खटल्याचा सामना करावा लागणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पवन खेडा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अलाहाबाद हायकोर्टाने पवन खेडा यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता. पीएम मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पवन खेडा यांच्यावर हजरतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन खेडा यांनी 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या वडिलांविरोधात चुकीची टिप्पणी केली होती.

मार्चमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदींविरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी खेडाविरुद्धच्या सर्व एफआयआर एकत्र केल्या होत्या. यासोबतच न्यायालयाने अंतरिम जामिनाची मुदतही वाढवली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना २३ फेब्रुवारीला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्यांना रायपूरला जाणाऱ्या विमानातून काढण्यात आले होते.