---Advertisement---

पश्चिम झोन राष्ट्रीय बॉक्सिंग सर्धेत गौरवीला सुवर्ण पदक

---Advertisement---

जळगाव : जळगाव बॉक्सिंग सेंटरची विद्यार्थीनी गौरवी गरुड हीस बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त झाले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अहमदाबाद, गुजरात येथे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे राष्ट्रीय वेस्ट झोन बॉक्सिंग स्पर्धा दि. 5 ते 7 मार्च दरम्यान घेण्यातआल्या होत्या. मुलींच्या 67+ किलो वजन गटामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव अंतर्गत सुरू असलेल्या खेलो इंडीया बॉक्सिंग सेंटर जळगाव ची खेळाडू गौरवी गरुड ने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्ण पदक प्राप्त केले. गौरवी ला जिल्हास्तरीय खेलो बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment