अंधारात कमिशन एजंटला चाकू लावला अन् 61 हजारांची रोकड लांबवली

61 thousand cash was looted from a vegetable commission agent in Bhusawal भुसावळ : शहरातील भाजीपाला कमिशन एजंटला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील 61 हजारांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना गुरुवारी पहाटे 4.15 वाजता टिंबर मार्केट ते आराधना कॉलनीदरम्यान बोगद्यात घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास लूट झाल्याने खळबळ
भाजपाला कमिशन एजंट असलेले प्रकाश नामदेव चौधरी (69, पिताश्री बंगला, विद्यानगर, भुसावळ) हे घराकडून कृषी उत्पन्न बाजार समितीत दुचाकीने निघाल्यानंतर आराधना कॉलनीकडे जाणार्‍या ब्रिजखाली दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी जाम मोहल्ला कुठे आहे, अशी विचारणा केली व नंतर चोरट्यांनी दुचाकी पुढे नेल्यानंतर चौधरी यांना संशय आला व त्यांनी आरोपींच्या दुचाकीला (4496) ला लाथ मारल्याने चौधरी खाली पडले व त्याचवेळी दुचाकीस्वारामागील संशयीताने चाकूचा धाक दाखवून चौधरी यांच्या मोटर सायकलला लावलेली सुमारे 61 हजार रूपयांची रोकड असलेली बॅग व त्यातील डायरी घेवून जामनेररोडमार्गे पळ काढला. तपास हवालदार शशीकांत पाटील करीत आहेत.