पहूर : गोरसेना व विमुक्त जाती – अ प्रवर्गातील सकल संघटनेतर्फे आज मंगळवारी विविध मागण्यांसाठी येथील बसस्थानकावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे यांच्या कारच्या काचा फोडल्याने वातावरण चिघळले. पोलीस कर्मचारी गोपाल गायकवाड हे मोबाईलवर व्हिडीओ चित्रण करत असता जमावाने ढकलून दिल्याने मोबाईल खाली पडून फुटला. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले. या प्रकरणी बाबुराव घोंगडेच्या फिर्यादीवरून १० ते१५ अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन तास वाहतूक ठप्प होती. सकाळी अकरा वाजेपासून गोर सेना संघटनेचे कार्यकर्ते जमायला सुरूवात झाली. हजारोंच्या सख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी पहूर बसस्थानकावर रास्तारोको करीत सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे यांच्या कारच्या काचा फोडल्याने वातावरण चिघळले. पोलीस कर्मचारी गोपाल गायकवाड हे मोबाईलवर व्हिडीओ चित्रण करत असता जमावाने ढकलून दिल्याने मोबाईल खाली पडून फुटला. दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर ,पाचोरा पोलीस विभागीय अधिकारी वेरूळे ,पोलिस निरिक्षक किरण शिंदे,पी एस आय संजय बनसोड यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले. याबाबत बाबुराव घोंगडेच्या फिर्यादीवरून १० ते१५ अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहे.
काय आहे मागणी ?
विमुक्त जाती अ प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करावे.
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समिती मध्ये विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील एका तज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक द्यावी .
महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेला रक्त नाते संबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा .
महाराष्ट्रातील खरे राजपूत भामटा व विमुक्तशाजाती अ प्रवर्गातील सर्व जातीचे लोक कुठे राहतात. त्यांची तालुकानिहाय जिल्ह्यांची यादी शासनामार्फत त्वरित जाहिर करावी.
राज्य मागास अहवाल क्र.४९/२०१४ लागु करण्यात यावा.
तहसीलदाराला निवेदन
प्रा.संदेश चव्हाण यांनी राज्य सरकारला तंबी देत संपूर्ण महाराष्ट्रात ६२ विधानसभा मतदार संघात गोर बंजारा समाज व विमुक्त जाती अ प्रवर्गातील लोक राहतात. आमच्या मागण्या व समस्या न सोडविल्यास येत्या २०२४ च्या निवडणुकीत सरकारला घरचा रस्ता दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले.