---Advertisement---

पांढऱ्या सोन्या’वर चोरट्यांचा डल्ला, वाकोदच्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

---Advertisement---

पहूर : वाकोद येथील एका शेतकर्‍याच्या गोठ्यातून चोरट्यानीं सुमारे 78 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र भगवान भगत (31, वाकोद, ता.जामनेर) हे शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे वाकोद ते तोंडापूर रस्त्यावर शेत असून या शेतात त्यांनी कापूस लावला असून कापूसाची वेचणी करून शेतातील गोठ्यात 13 ते 15 क्विंटल वजनाचा कापूस भाववाढीच्या आशेने साठवून ठेवला होता मात्र गुरुवार, 2 फेब्रुवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा दरवाजा तोडून आत ठेवलेला 78 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी रवींद्र भगत यांनी पहूर पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment