---Advertisement---

पाकिस्तानी क्रीडा पत्रकार झैनाब अब्बासची भारतातून हकालपट्टी, ‘हे’ आहे कारण?

---Advertisement---
मुंबई : भारतात सध्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरु असताना पाकिस्तानच्या एका क्रीडा पत्रकाराची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. झैनाब अब्बास असे या पाकीस्तानी क्रिडा पत्रकाराचे नाव आहे. ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
भारतात एकदिवसीय क्रिकेटच्या सामने खेळण्यासाठी पाकिस्तानी संघ आणि पत्रकार भारतात आले आहेत. यातच पाकिस्तानमधील क्रीडा पत्रकार झैनाब अब्बास हिदेखील भारतात आली होती. यावेळी तिचे सोशल मीडिया अकाऊंट तपासण्यात आलेत. तिने आपल्या पोस्टमध्ये हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह टीका केली असल्याचे लक्षात आले.
तसेच सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये ती सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्मासाठी अपशब्द वापरताना दिसत आहे. त्यामुळे आता भारतातून तिची हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या ती दुबईमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment