पाकिस्तान : सोमवारी पेशावरमध्ये सोमवारी नमाज पठणाच्या वेळीच मशिदीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. यात आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, शोध आणि बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
या मशिदीजवळच पेशावरचे पोलीस मुख्यालय आणि इतर सरकारी कार्यालये आहेत. पेशावरमधील उच्च सुरक्षा असलेल्या भागातच हा स्फोट झाला आहे.