जळगाव : पाचोरा मतदारसंघ दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहिला आहे. हे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे असल्याचा आरोप करत, भाजप तालुकाध्यक्षयांनी नाव न घेता आमदार किशोर पाटील यांच्यावर टिका केली.
त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, पाचोरा व भडगाव तालुक्यात गेल्या काळात देखील दुष्काळग्रस्त परिस्थिती होती. यावर्षीही मतदार संघात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना, पाचोरा मतदारसंघ दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहिला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील आ. मंगेश चव्हाण यांनी त्यांचा चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन घेत जवळपास १३३ कोटींचे पॅकेज मंजुर करुन आणले. मात्र पाचोरा मतदार संघाचे स्थानिक प्रतिनिधी यांनी पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त न करुन घेता फक्त दुष्काळ सदृश्य घोषित करुन शेतकर्यांच्या तोंडाला फक्त आणि फक्त पाने पुसली आहेत. अशी टीकाही त्यांनी केली. पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्रदिप पाटील, सोमनाथ पाटील, अरुण पवार, जगदिश पाटील, समाधान मुळे, योगेश ठाकुर आदी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्या !
पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशा आषयाच्या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे.