पाचोर्‍यात अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड, वीस हजारांच्या मुद्देमालासह पाच जण ताब्यात

पाचोर्‍या : शहरात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत वीस हजारांच्या  मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सोमवार, 23 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पाच ठिकाणी धाड टाकण्यात आली.

दरम्यान, सट्टा, चक्री खेळविताना व दारू विक्री करताना वीस हजारांच्या  मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.  प्रकाश विठ्ठल पाटील , राहुल निकम, राकेश गोवर्धन मोची, सागर दिलीप कानडे, दिनकर धोंडीराम चव्हाण यांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. लगेच नोटीस देऊन या आरोपींना सोडण्यात आले.

पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस कर्मचारी विश्वास देशमुख, राहुल शिंपी,संतोष राजपूत, संदीप राजपूत ,समीर पाटील, समाधान बोरसे यांनी ही कारवाई केली.