पाचोरा : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या बनावट दारु विक्री, सट्टा, पत्ता व चकरी असे अनेक उद्योग पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने सुसाट सुरु आहेत. अवैध्य धंदे तात्काळ बंद करुण सदर बेजाजबदार व उर्मट पोलीस निरीक्षकावर कडक कारवाई, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत पोलीस अधिक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांना निवेदन देणार आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना या विषयासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली, असता त्यांनी उर्मटपणे भाजपा पदाधिकाऱ्यांना शिवराळ भाषा वापरुली. शिवाय ‘मला वरीष्ठांना हफ्ते द्यावे लागतात. त्यामुळे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’ अशा पध्दीतीने बेताल वक्तव्य करत एक प्रकारे अवैध्य धंद्यांना खत-पाणी घातले आहे.
पाचोरा शहर व ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या अवैध्य धंद्यांना पोलीस प्रशासनाचा वचक असला पाहिजे परंतु येथे पोलीस निरीक्षकच जर अशा पध्दतीने वक्तव्य करुण त्याला खत पाणी घालत असतील व सदर अवैध्य धंदे त्यांच्या आशीर्वादाने चालत असतील तर याबाबतीत आम्ही ऐकुण घेणार नाहीत. आज सट्टा व पत्यांच्या नांदाला लागुन अनधिकृत रित्या विकल्या जाणाऱ्या बनावट दारुमुळे बऱ्यांच माता – भगीनींचे संसार उध्वस्त् झालेत व पाचोरा तालुक्यातील तरुण हा चुकीच्या मार्गाने जात आहे. व असंख्य व्यसानाच्या विळख्यात अडकला आहे.
यामुळे पाचोऱ्यासारख्या सुसंस्कृत तालुक्याचे नाव खराब होत आहे. यासाठी येथील पोलीस प्रशासन व स्थानिक पोलीस अधिकारी हे सर्वस्वी जबाबदार आहेत यांनी स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी व हफ्त्यांसाठी येथील माता-भगीनींच्या संसाराचा आणि नागरीकांच्या व तरुणांच्या जिवाशी खेळ लावला आहे. परंतु हे कदापी सहन केले जाणार नाही. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील अवैध्य धंदे तात्काळ बंद करुण सदर बेजाजबदार व उर्मट पोलीस निरीक्षकावर कडक कारवाई करावी. यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन दिले आहे. व यासंदर्भात योग्य ती कारवाई न-झाल्यास पाचोरा पोलीस स्टेशन समोर भाजपा पदाधिकारी धरणे आंदोलन करतील. असे अमोल शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे.
याप्रसंगी निवेदन देतांना भाजपा शहराध्यक्ष दिपक माने, सरचिटणीस समाधान मुळे, जगदीश पाटील तालुका उपाध्यक्ष विरेंद्र चौधरी , टिपु देशमुख ,सहीद शेख, योगेश ठाकुर, लकी पाटील, रोहन मिश्रा, विशाल सोनवणे, प्रदिप पाटील, लक्ष्मण शिंदे, अमोल नाथ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.