---Advertisement---

पाच दिवसांनी बुध ग्रह करणार दुसऱ्या राशीत प्रवेश; या राशींवर असेल कृपा

---Advertisement---

मिथुन : या राशीच्या तिसऱ्या स्थानात बुध गोचर करणार आहे. त्यामुळे एखादं लक्ष्य गाठणं सोपं होईल. जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. जागा किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तेही पूर्ण होईल असं ग्रहमान आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायी ठरेल.

सिंह : याच राशीत पाच दिवसांनी बुध ग्रह विराजमान होणार आहे. त्यामुळे बुधाचं पाठबळ मिळेल. लग्नस्थान असल्याने स्वभावात लक्षणीय बदल दिसून येईल. तसेच आत्मविश्वासाने किचकट कामं पूर्ण कराल. आर्थिक स्थिती भक्कम होईल, पण त्यासोबत इतर खर्चही वाढतील. एकंदरीत गोचर कालावधीत लाभ होईल.

तूळ : या राशीच्या एकादश भावात बुधाचं गोचर होणार आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळे. या काळात सुरु केलेला नवा धंदा फळेल असंच ग्रहमान आहे. आरोग्यविषयक तक्रारीही दूर होतील. एकंदरीत केलेल्या परीश्रमाचं चांगलं फळ मिळेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---