---Advertisement---

पाय घसरला अन् थेट 20 मजल्यावरून पडला; थरकाप उडवणारा व्हिडिओ

---Advertisement---

इमारतींवर स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसीडी याचा हाँगकाँगमधील एका उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आहे. जात एक व्यक्ती जवळपास २० मजल्याच्या इमारतीच्या छतावरून पडला आहे. या दुर्घटनेमध्ये व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती असून व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठ्या इमारतीच्या छताच्या टोकावर उभा असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या इमारतीमध्ये असलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. तेवढ्यात सदर व्यक्तीचा पाय घसरतो अन् बघता बघता तो थेट खाली कोसळतो. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

https://twitter.com/1000waystod1e/status/1686128518890209280

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment