पारोळा तालुका क्रीडा संकुलाचा कामाला सुरूवात; जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केली पाहणी

पारोळा : येथील तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होऊन बंदिस्त व खुल्या तालिमेसाठी युवकांसह क्रीडा प्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आ. चिमणराव पाटील यांनी गेल्या ३ महिन्यांपुर्वी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना क्रिडा संकुलाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचे आदेश दिले होते.

या प्रस्तावाचा आ. चिमणराव पाटील यांनी पाठपुरावा करून पारोळा व एरंडोल तालुका क्रिडा संकुलासाठी प्रत्येकी ५ कोटी रूपयांना मंजुरी देण्यात आली होती. या क्रिडा संकुलाचा कामाचा सर्व प्रशासकीय बाबी पुर्ण करून या कामाला अखेर आज सुरूवात करण्यात आली. या कामाची आज जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल चिमणराव पाटील यांनी पाहणी करून मैदानी खेळांसह इतर बंदिस्त खेळ सुरू करण्यासाठी आवश्यक कामांना प्रथम प्राधान्याने पुर्ण करा तसेच दैनंदिन वाॕकिंग, योगा यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा याठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग इतर व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा सुचना दिल्या. या संकुलाचा कामाला गतीने पुर्ण करून लवकरच हे क्रिडा संकुल क्रिडा प्रेमींना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले.